एप्रिल 2012
ॐ
हरिद्रा
हरिद्रा-हळद-हल्दी-टर्मरिक. संस्कृतमध्ये हळदीला अनेक नावं आहेत पण हरिद्रा हे अनेकवेळा वापरलं जाणारं नाव. बहुतांश लोकांच्या नेहमीच्या परिचयाची असणारी ही हळद भारतीय जेवणात रोज वापरला जाणारा अत्यावश्यक घटक आहे.
आपल्याकडे फ़ारच कमी वेळा हळद न घालता फ़ोडणी केली जात असेल, नाही का? थोडक्यात काय आपल्या प्रत्येक भाजी-आमटीत हळद असतेच असतेच. काही चिरताना कापलं, खरचटलं तर हीच हळद रक्त थांबवण्यासाठी हमखास उपयोगी पडते. लग्न लागण्याआधी आदल्या दिवशी वधू-वरांना हळद लावण्याचा विशेष कार्यक्रम होतो. थोडक्यात हळद हा भारतीयांच्या जेवणातला महत्त्वाचा घटक तर आहेच पण त्याचबरोबर अगदी रोजच्या जीवनात आणि विशेष प्रसंगीही त्याला विशेष महत्त्व आहे.
आयुर्वेदानुसार तर हळद म्हणजे एक महत्त्वाचे औषध. हळद रोज रेग्युलरली वापरली तर स्किनचा कलर उजळणारी, इचिंग कमी करणारी(विशेषत: अर्टिकेरियामध्ये (अंगावर लाल रंगाचे गोल रॅश उठणे- ह्यालाच पित्त उठणं असंही म्हणतात) ह्यात खूप चांगले इफ़ेक्टस मिळतात), पाय मुरगळला असेल तर हळद आणि तुरटीचा लेप हमखास लावला जायचा कारण हळद सूज कमी करणारी आहे. सगळ्यात महत्त्वाचा हळदीचा उपयोग पूर्वापार केला जातो तो म्हणजे थोडंसं कापलं, खरचटलं आणि रक्त आलं की त्यावर सगळ्यात आधी हळद लावली जाते. हळद ताबडतोब रक्तस्त्राव(ब्लिडींग) थांबवणारी, जखम भरणारी आहे. त्याचबरोबर हळद अनेक स्किन डिसीजेस आणि स्किनच्या इन्फ़ेक्शनवर औषध म्हणून काम करते. .
त्याचप्रमाणे कफ़ाच्या रोगांवर, डायबिटीसवर, वर्म्स, जॉन्डीस (कावीळ) यांवर उत्तम प्रकारे काम करते.
म्हणजेच हळदीमध्ये एवढे महत्त्वाचे गुण आहेत. अगदी हळदीचे पानही काही रेसिपीज तयार करण्यासाठी वापरतात. प्रत्येक देवघरात हळद-कुंकू हमखास असतंच. वर्षभरात खूप वेळा स्त्रियांचे हळदी-कुंकवाचे कार्यक्रम होतात.
त्याचबरोबरीने स्त्रिया कपाळाला हळद आणि कुंकू लावतात. म्हणजे तसं बघितलं तर हळद ही फ़क्त किचनपुरती किंवा औषध म्हणून मर्यादित नाही तर आपल्या जीवनात तिचा आपण अगदी रोजच्या रोज वापर करतोच.
आता हळदीविषयी आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट. रामराज्य 2025 ह्या प्रवचनात सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी व्यक्तिगत आयुष्यात रामराज्य येण्यासाठी ज्या गोष्टी करायला सांगितल्या होत्या त्यापैकी एक गोष्ट होती, शताक्षीप्रसादम् खाणे. रामराज्य 2025 च्या पुस्तिकेत शताक्षीप्रसादम्विषयी सविस्तर माहिती दिलेलीच आहे. ह्या शताक्षीप्रसादम् मध्येही हळद हा एक महत्त्वाचा घटक आहे.
शताक्षीप्रसादम् म्हणजे साक्षात आदिमातेचा प्रसाद. आदिमाता महिषासुरमर्दिनीच्या प्रकट झालेल्या नऊ अवतारांपैकी पाचवा अवतार म्हणजे शताक्षी. मातरैश्वर्यवेदामध्ये ह्याचे सविस्तर वर्णन आलेलेच आहे. शेवटी आणखी एक महत्त्वाची गोष्ट -माता शिवगंगागौरीलाही हळद अत्यंत प्रिय असणारी आहे.
थोडक्यात हळद हा एक रोजच्या वापरातला पदार्थ तर आहेच पण त्याचबरोबर तो अतिशय औषधीही आहे.