Friday, January 28, 2011

ऋतुचर्या

 २८-०१-२०११

ऋतुचर्या


खूप थंडी पडलेली असताना लिहिलेल्या पोस्टनंतर खूपच दिवसांनी ही पुढली पोस्ट. आता ब-याच ठिकाणी ब-यापैकी उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे. 
क्लायमेट चेंज झाल्यानंतर घडणारी पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजारांची सुरुवात. आता थंडी संपून उन्हाळा सुरू झाल्यावर सर्दी, खोकला यासारखे आजार डोक वर काढायला लागतात आणि ह्या रोगांच कारण आपल्याला माहीत असतंच, क्लायमेटमध्ये झालेला बदल आणि प्रत्येक वेळी असे क्लायमेटमध्ये बदल झाले की असे छॊटे मोठे आजार डोक वर काढतातच.
मग आज ह्याविषयीच थोड काही, अर्थातच आयुर्वेदाचा व्ह्यू. आपण संपूर्ण वर्षात तीन प्रकारच्या क्लायमेटचा अनुभव घेतो, उन्हाळा,पावसाळा आणि थंडी. अर्थात संपूर्ण जगात प्रत्येक ठिकाणी ह्याचं प्रमाण डिफ़र होतं. आयुर्वेद ह्यातीन प्रकारच्या क्लायमेटला सहा ऋतुंमध्ये डिव्हाइड केलेलं आहे. हे सहा ऋतु- शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद आणि हेमंत.  हेमंत ऋतुत थंडीची सुरुवात होते आणि शिशिरात चांगलीच थंडी असते, वसंतात उन्हाळ्याची सुरुवात होते आणि ग्रीष्मात हा उन्हाळा खूप कडक होतो, वर्षा म्हणजे पावसाळा, शरदात पाऊस संपून पुन्हा एकदा उष्णता जाणवायला लागते म्हणजे ऑक्टोबर हिट. 
भारतीय कालगणनेनुसार सपूर्ण वर्षात १२ महिने असतात. जसे सध्या आपण जानेवारी ते डिसेंबर हे बारा महिने मानतो. ह्या १२ महिन्यातल्या प्रत्येक दोन महिन्यात मिळून एक ऋतु असं गणित असतं. म्हणजे आयुर्वेद काळात अशी कालगणना असायची. आता सगळ्या जगातच जानेवारी ते डिसेंबर असे बारा महिने असल्यामुळे आज काल ऋतु त्यानुसार डिव्हाइड केले जातात. 
प्रत्येक ऋतु मध्ये विशिष्ट क्लायमेट असतं आणि त्यानुसार मग आपल्याला आपलं बिहेवियर ठेवायला लागतं म्हणजे ज्या ऋतुत जसं क्लायमेट तसं आपलं जेवण इ. आयुर्वेदाने कोणत्या ऋतुत काय खायचं काय खायचं नाही, काय करायचं काय करायचं नाही ह्याचा पूर्ण विचार केलेला आहे आणि त्याला ऋतुचर्या असं नाव दिलेलं आहे. एकूण सहा ऋतुंच्या सहा ऋतुचर्या. मग ह्यामध्ये काय खायचं काय नाही इथपासून ते कोणत्या प्रकारचे कपडे घालायचे हे सगळं सांगितलेलं आहे. फ़ॉर एक्झाम्पल शिशिर ऋतुमध्ये थंडीचं प्रमाण खूप जास्त असतं मग अशावेळी लोकरीचे जाड कपडे घालणं आवश्यक आहे. तर उन्हाळ्यात कॉटनचे कपडे घालायचे. ऋतुचर्येतला महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्या ऋतुत कोणत्या दोषाचा प्रकोप होतो आणि का होतो, हे सविस्तर सांगितलेलं आहे आणि मग त्यावर काय उपाय करायचे ते देखील सांगितलेलं आहे. जसं आता थंडी संपून उन्हाळा सुरू झाला की सर्दी , खोकला होतो कारण जसा उष्णतेने बर्फ़ वितळतो तसाच बाहेरच्या उष्णतेमुळे थंडीत शरीरात अ‍ॅक्युम्युलेट झालेला कफ़ पातळ होतो आणि सर्दी, खोकला ह्यांची सुरुवात होते, तसचं पावसाळ्यात शरीरात पित्त अ‍ॅक्युम्युलेट होतं आणि ते शरद ऋतुतल्या उष्णतेने शरीरात वेगवेगळे रोग उत्पन्न करू शकतं त्याचप्रमाणे उन्हाळ्यात शरीरात वात अ‍ॅक्युम्युलेट होतो आनि तो त्यानंतर येणा-या पावसाळ्यात वाताचे वेगवेगळे डिसीजेस उत्पन्न करू शकतो. 
अर्थात ह्या क्रिया जरी नॅचरल असल्या तरी त्यावरचा उपायही आयुर्वेदा सांगतो कारण शेवटी आयुर्वेदाला माणसाची हेल्थ चांगली ठेवायची आहे. म्हणूनच ह्यावरचा पहिला उपाय आयुर्वेदाने सांगितला आहे,तो म्हणजे एक ऋतु बदलून जेव्हा दुसरा सुरू होणार असतो तेव्हा जाणा-या ऋतुचा शेवटचा आठवडा आणि येणा-या ऋतुचा पहिला आठवडा, ज्याला ऋतुसंधि म्हटलं जातं, त्यात आधी आपण जे सगळे जेवणाचे, वागण्याचे रुल्स फ़ॉलो करतो ते हळूहळू सोडून द्यायचे आणि हळूहळू नव्या येणा-या ऋतुच्या जेवण्या-वागण्यासंबंधीच्या रुल्सना फ़ॉलो करायचं. ह्यामुळे जरी शरीरात वर सांगितल्याप्रमाणे नॅचरल चेंजेस घडले म्हणजे शरीरातले दोष विशिएट झाले तरी ते कंटोलमध्ये राहतील आणि डिसीज उत्पन्न करू शकणार नाहीत. दुसरा आयुर्वेदाचा उपाय म्हणजे विशिष्ट ऋतुत विशिष्ट पंचकर्म कणं. आजकाल पंचकर्म हा शब्द ब-याच जणांना ऐकून माहीत आहे. ह्या पंचकर्माविषयी पुढे कधीतरी सविस्तर बोलूया.       
ह्यात आणखी एक महत्त्वाची इन्फ़र्मेशन द्यायची म्हणजे कुठल्या ऋतुत कुठलं पाणी प्यायचं, तेही ऋतुचर्येत सांगितलेलं आहे. शरद ऋतुत अगस्ती नावाच्या ता-याचा उदय होतो आणि त्यावेळी सगळ्या पॉन्डस, लेक्स मधल पाणी निर्विष होतं असं आयुर्वेदात वर्णन येतं, त्याला त्यांनी हंसोदक असं नाव दिलेलं आहे. कारण हंस नेहमी फ़क्त शुद्ध पाणीच पितो, असं सांगितलं जातं आणि म्हणूनच शुद्ध पाण्याला त्याकाळी हंसोदक ही उपमा दिली जात असावी. आज काल आपल्याला प्युरिफ़ाइड पाणी सहज मिळतं त्यामुळे आपल्याला त्या काळातल हे पाण्याविषयीचं वर्णन वाचून आश्चर्य वाटेल.  
आता सध्या काही दिवसांपूर्वीच संक्रांत होऊन गेली. खर तर संक्रांत म्हणजे संक्रमण. ह्या वेळी सूर्याचं उत्तरायण सुरू होतं. त्यामुळे आता भारतात दिवस हळूहळू मोठा व्हायला सुरुवात होते. ह्या वेळी संक्रांतीच्या वेळी असंख्य स्त्रियांनी बापूंनी रामराज्याच्या प्रवचनात सांगितल्याप्रमाणे "श्रीमंगलचण्डिकानैमित्तिकप्रपत्ती’’ केली. ह्याचा मुख्य उद्देश्य बापूंनी सांगितला होता की "ही प्रपत्ती करणारी स्त्री तिच्या कुटुंबाची रक्षणकर्ती सैनिक बनते”. ह्याविषयी बापूंनी आणखी जे काही सांगितलेलं आहे, ते मूळातून वाचण्यासारखं आहे. पण ह्यावरून आपल्या मुख्य ही गोष्ट लक्षात येईल की ही प्रपत्ती करणारी स्त्री स्वत:तर सबल बनतेच आणि इतकी सबल बनते की तिच्यामध्ये तिच्या पूर्ण कुटुंबाचं रक्षण करण्याची कपॅसिटी येते. रियली अमेझिंग. कारण रक्षण करायला फ़िजिकल आणि मेंटल दोन्ही प्रकारची स्ट्रेंथ लागते आणि ही प्रपत्ती केल्याने अर्थातच ती मिळते. रामराज्याच्या प्रवचनात बापूंनी पुरुषांसाठी श्रावणातल्या सोमवारी "श्रीरणचण्डिकानैमित्तिकप्रपत्ती” सांगितली होती, जी अर्थातच मागच्या वर्षी श्रावण महिन्यात पुरुषांनी केलीही. 
सध्याचा काळ बघितला तर रोजच्या लाइफ़मध्येच आपण एवढ्या स्ट्रेस आणि स्ट्रेन्सना सामोरे जात असतो की अशा वेळी आपल्याला फ़िजिकल आणि मेंटल दोन्ही प्रकारच्या स्ट्रेन्थच महत्त्व आणि गरज लक्षात येते आणि माणसाने कितीही एफ़र्टस केले तरी ह्या दोन्ही स्ट्रेन्थ एकाच वेळी आणि प्रत्येकासाठी उचित तेवढ्या प्रमाणात केवळ सद्‍गुरुच देऊ शकतात.