Saturday, April 7, 2012

हरिद्रा

एप्रिल 2012

हरिद्रा


हरिद्रा-हळद-हल्दी-टर्मरिक. संस्कृतमध्ये हळदीला अनेक नावं आहेत पण हरिद्रा हे अनेकवेळा वापरलं जाणारं नाव. बहुतांश लोकांच्या नेहमीच्या परिचयाची असणारी ही हळद भारतीय जेवणात रोज वापरला जाणारा अत्यावश्यक घटक आहे.
आपल्याकडे फ़ारच कमी वेळा हळद न घालता फ़ोडणी केली जात असेल, नाही का? थोडक्यात काय आपल्या प्रत्येक भाजी-आमटीत हळद असतेच असतेच. काही चिरताना कापलं, खरचटलं तर हीच हळद रक्त थांबवण्यासाठी हमखास उपयोगी पडते. लग्न लागण्याआधी आदल्या दिवशी वधू-वरांना हळद लावण्याचा विशेष कार्यक्रम होतो. थोडक्यात हळद हा भारतीयांच्या जेवणातला महत्त्वाचा घटक तर आहेच पण त्याचबरोबर अगदी रोजच्या जीवनात आणि विशेष प्रसंगीही त्याला विशेष महत्त्व आहे.
आयुर्वेदानुसार तर हळद म्हणजे एक महत्त्वाचे औषध. हळद रोज रेग्युलरली वापरली तर स्किनचा कलर उजळणारी, इचिंग कमी करणारी(विशेषत: अर्टिकेरियामध्ये (अंगावर लाल रंगाचे गोल रॅश उठणे- ह्यालाच पित्त उठणं असंही म्हणतात) ह्यात खूप चांगले इफ़ेक्टस मिळतात), पाय मुरगळला असेल तर हळद आणि तुरटीचा लेप हमखास लावला जायचा कारण हळद सूज कमी करणारी आहे. सगळ्यात महत्त्वाचा हळदीचा उपयोग पूर्वापार केला जातो तो म्हणजे थोडंसं कापलं, खरचटलं आणि रक्त आलं की त्यावर सगळ्यात आधी हळद लावली जाते. हळद ताबडतोब रक्तस्त्राव(ब्लिडींग) थांबवणारी, जखम भरणारी आहे. त्याचबरोबर हळद अनेक स्किन डिसीजेस आणि स्किनच्या इन्फ़ेक्शनवर औषध म्हणून काम करते. .
त्याचप्रमाणे कफ़ाच्या रोगांवर, डायबिटीसवर, वर्म्स, जॉन्डीस (कावीळ) यांवर उत्तम प्रकारे काम करते.
म्हणजेच हळदीमध्ये एवढे महत्त्वाचे गुण आहेत. अगदी हळदीचे पानही काही रेसिपीज तयार करण्यासाठी वापरतात. प्रत्येक देवघरात हळद-कुंकू हमखास असतंच. वर्षभरात खूप वेळा स्त्रियांचे हळदी-कुंकवाचे कार्यक्रम होतात.
त्याचबरोबरीने स्त्रिया कपाळाला हळद आणि कुंकू लावतात. म्हणजे तसं बघितलं तर हळद ही फ़क्त किचनपुरती किंवा औषध म्हणून मर्यादित नाही तर आपल्या जीवनात तिचा आपण अगदी रोजच्या रोज वापर करतोच.
आता हळदीविषयी आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट. रामराज्य 2025 ह्या प्रवचनात सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांनी व्यक्तिगत आयुष्यात रामराज्य येण्यासाठी ज्या गोष्टी करायला सांगितल्या होत्या त्यापैकी एक गोष्ट होती, शताक्षीप्रसादम्‌ खाणे. रामराज्य 2025 च्या पुस्तिकेत शताक्षीप्रसादम्‌विषयी सविस्तर माहिती दिलेलीच आहे. ह्या शताक्षीप्रसादम्‌ मध्येही हळद हा एक महत्त्वाचा घटक आहे.
शताक्षीप्रसादम्‌ म्हणजे साक्षात आदिमातेचा प्रसाद. आदिमाता महिषासुरमर्दिनीच्या प्रकट झालेल्या नऊ अवतारांपैकी पाचवा अवतार म्हणजे शताक्षी. मातरैश्वर्यवेदामध्ये ह्याचे सविस्तर वर्णन आलेलेच आहे. शेवटी आणखी एक महत्त्वाची गोष्ट -माता शिवगंगागौरीलाही हळद अत्यंत प्रिय असणारी आहे.
थोडक्यात हळद हा एक रोजच्या वापरातला पदार्थ तर आहेच पण त्याचबरोबर तो अतिशय औषधीही आहे. 

Friday, September 23, 2011

सहोपासना

।। ॐ ।।

सहोपासना



आपणा सर्वांना ठाऊकच आहे की विश्वकल्याणाच्या उदात्त उद्देशाने परमपूज्य सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध बापु आश्विन शुक्ल प्रतिपदा- घटस्थापना- बुधवार 28 सप्टेंबर2011- अशुभनाशिनी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून 2012च्या  चैत्र शुक्ल नवमीपर्यंत- शुभंकरा नवरात्रीच्या नवमीपर्यंत- रामनवमीपर्यंत ’घोर तपश्चर्या' करणार आहेत. परमपूज्य बापुंच्या कृपेने आम्हां श्रद्धावानांना ’श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम्‌'मध्ये ’सहोपासना' आणि ’मातृवात्सल्यविन्दानम्‌' पठण करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.  सहोपासनेमध्ये खालील 7 उपासनांचा समावेश आहे.

1) दत्तमंगलचण्डिका स्तोत्र- 108 वेळा
2) आदिमाता शुभंकरा स्तवन- 108 वेळा
3) आदिमाता अशुभनाशिनी स्तवन- 108 वेळा
4) सनातनदेवीसूक्त- 54 वेळा
5) दत्तबावनी- 52 वेळा
6) महिषासुरमर्दिनी आरती (जपाच्या स्वरूपात)- 54 वेळा
7) अनसूया मातेची आरती (जपाच्या स्वरूपात )- 108 वेळा

Saturday, September 10, 2011

बापूंची घोर तपश्चर्या



सप्टेंबर २०११
बापूंची घोर तपश्चर्या
लहानपणी आजी गोष्ट सांगायची. तिच्या गोष्टीत हमखास कोणी तरी तपश्चर्या केल्याचा उल्लेख असायचा. तेव्हापासून तपश्चर्या ह्या शब्दाशी ओळख झाली. पुढे शाळेत असतानाही शालेय अभ्यासक्रमात कधी ना कधी तरी हा शब्द कानावर पडत होता. त्यानंतर थेट  गुरुवारी इतक्या वर्षांनंतर तपश्चर्या हा शब्द सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांच्या मुखातून ऐकला. गुरुवारी सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनी श्रीहरिगुरुग्राम येथे सांगितले की ते स्वत: येत्या आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून म्हणजेच अशुभनाशिनी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते रामनवमीपर्यंत म्हणजे शुभंकरा नवरात्रीच्या नवव्या दिवसापर्यंत तपश्चर्या आणि तीही घोर तपश्चर्या करणार आहेत.
सद्‍गुरुंना स्वत:ला तपश्चर्या करण्याची गरज का भासावी याचं उत्तर बापूंनी स्वत:च त्यांच्या गुरुवारच्या प्रवचनात दिलं. त्यानुसार श्रद्धावानांची उपासना व्यवस्थित होत नाही, गुरुमंत्र मिळूनही श्रद्धावानांच्या मनात अनेक तर्क-कुतर्क आहेत, त्यामुळे त्यांना ह्या गुरुमंत्राचं फ़ळ प्राप्त होत नाही. ह्या सगळ्यावर उपाय म्हणून बापूंनी स्वत: घोर तपश्चर्या करण्याचे ठरविले आहे.
आयुर्वेदात एक महत्त्वाचा सिद्धांत प्रतिपादित केलेला आहे. प्रत्येक युगात मानवाचे आयुष्य आणि त्याचबरोबरीने त्याच्यातील सत्त्व गुण घटत जातो, कमी होत जातो. सत्ययुगात मानवाचे आयुष्य 400 वर्षांचे होते आणि सत्त्वगुण भरपूर होता. कलियुगात माणसाचे आयुष्य फ़क्त 100 वर्षांचे आहे आणि माणसातला सत्त्वगुण अतिशय कमी झालेला आहे. त्याच वेळेस माणसातले रज आणि तम ह्या गुणांचे प्रमाण खूपच वाढले आहे. रजोगुण हा चंचलता निर्माण करणारा तर तमोगुण आवरण करणारा आहे.
गुरुक्षेत्रम्‌ मंत्रावर, गुरुक्षेत्रम्‌वर आणि बापूंवर प्रेम करणा-या श्रद्धावानांच्या जास्तीत जास्त चुका कमी करून, त्यांच्यावर कर्जाच्या राशी जमू नयेत आणि त्याला जास्तीत जास्त क्षमा मिळावी म्हणून बापू स्वत: तपश्चर्या करणार आहेत.
आपल्या भारतभूमीत तपश्चर्येचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. इतकं की परमात्मा जेव्हा राम, परशुराम ह्या नावाने मनुष्य रूपात अवतीर्ण झाला तेव्हा त्यांनीही तपश्चर्या केली होती.
आज प्रत्येक सच्च्या श्रद्धावानाचे प्रयास स्वत:चे दैनंदिन जीवन जगताना कुठेतरी कमी पडतात आणि ते त्यांना स्वत:ला जाणवतंही. म्हणूनच बापू पुढे असंही म्हणाले की या तपश्चर्येदरम्यान प्रत्येक श्रद्धावानाने स्वत:ला दूषणं देणे, स्वत:ला कमी लेखणे, स्वत:ला पापी समजणे पूर्णपणे थांबवावे आणि जास्तीत जास्त वेळ भक्ती व उपासनेत घालवावा.
आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा- बापूंच्या ह्या तपश्चर्येचं फलित म्हणजे सर्वांग ब्रह्मास्त्र व सर्वांग करुणाश्रय. ब्रह्मास्त्र जे वाईट आणि चुकीचे आहे त्याचा नाश करणारे आहे; तर जो बापूंवर आणि भारतावर प्रेम करतो, त्याच्यासाठी करुणाश्रय आहे आणि ह्याची स्थापना बापू गुरुक्षेत्रम्‌ येथे करणार आहेत.