Thursday, September 23, 2010



आरंभ
        खरं तरब्लॉगची सुरुवात करायला मुहूर्त पाहायची आवश्यकता नाही. पण खूप दिवस आज करू उद्या करू म्हणून हे काम मागे पडतच गेलं. अगदी गणपतीच्या आगमना बरोबर हे काम करायचं नक्की केलं होतं, पण ते ही मागे पडलं आणि आजचा दिवस उजाडला. म्हटलं आज तरी हे काम नक्कीच करूया. कालच गणपती त्यांच्या गावाला गेले. पुढच्या वर्षी लौकर या, असं त्यांना आपण आवर्जून सांगितलं.
       पण अजूनही गणपतीचे दिवस आले की लहानपणचे दिवस आठवतातं. मखर, गणपतीबाप्पाची अतिशय मनमोहक मूर्ति आणि ती ही शाडूच्या मातीपासून तयार केलेली, उदबत्यांचा सुगंध, आरती, मोदक, वेगवेगळी फुलं-पत्री, गणपति-अथर्वशीर्ष आणि त्या अथर्वशीर्षाची सहस्रावर्तनं आणि मु"य म्हनजे सगळीकडे भरून राहीलेलं चैतन्य आणि सळसळता उत्साह. अजूनही  ॐ नमस्ते गणपतये। त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि।---- असे सूर कानावर आल्यावर परत एकदा लहानपनचे दिवस आठवतात.आता काळानुसार अनेक बदलही झाले पण अजूनही  पण अजूनही गणपतीचे दिवस आले की एक चैतन्य, एक उत्साह आणि मु"य म्हणजे एक आनंद आपोआपच सगळ्या वातावरणात भरून राहतो. दीड, पाच, सात आणि अनंत चतुर्दशीपर्यंत एक वेगळंच चैतन्य सगळ्या वातावरणात जाणवत राहतं.मात्र गणपतीबाप्पांन निरोप दिल्यावर नंतर समुद्रकिनारी गेल्यावर फारच विचित्र दृश्य दिसायचं सग़ळ्या किनाऱ्यांवर गणपतीच्या मूर्तींचे छोटे मोठे भाग वाहून आलेले असायचे.पण गेल्या काही वर्षांपासून ही परिस्थिती  पार बदलली आहे. "अनिरुद्ध उपासना फाउंडेशन'चे व्हॉलेंटियर्स प्रत्येक समुद्रकिनाऱ्यावर जाऊन संध्याकाळपर्यंत समुद्रकिनाऱ्यांचं रूपच बदलून टाकतात. आणि हो अनंतचतुर्दशीच्या दिवशी वाहतुकीच्या नियंत्रणात "अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट'चे व्हॉलेंटियर्स मदत करतात. आपण बोलबोलता गणपतींच्या आगमनापासून पार अनंतचतुर्दशीपर्यंत पोचले देखील. त्यामुळे तूर्तास निरोप घेऊया.