।। ॐ ।।
सहोपासना
सहोपासना
आपणा सर्वांना ठाऊकच आहे की विश्वकल्याणाच्या उदात्त उद्देशाने परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापु आश्विन शुक्ल प्रतिपदा- घटस्थापना- बुधवार 28 सप्टेंबर2011- अशुभनाशिनी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून 2012च्या चैत्र शुक्ल नवमीपर्यंत- शुभंकरा नवरात्रीच्या नवमीपर्यंत- रामनवमीपर्यंत ’घोर तपश्चर्या' करणार आहेत. परमपूज्य बापुंच्या कृपेने आम्हां श्रद्धावानांना ’श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम्'मध्ये ’सहोपासना' आणि ’मातृवात्सल्यविन्दानम्' पठण करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. सहोपासनेमध्ये खालील 7 उपासनांचा समावेश आहे.
1) दत्तमंगलचण्डिका स्तोत्र- 108 वेळा
2) आदिमाता शुभंकरा स्तवन- 108 वेळा
3) आदिमाता अशुभनाशिनी स्तवन- 108 वेळा
4) सनातनदेवीसूक्त- 54 वेळा
5) दत्तबावनी- 52 वेळा
6) महिषासुरमर्दिनी आरती (जपाच्या स्वरूपात)- 54 वेळा
7) अनसूया मातेची आरती (जपाच्या स्वरूपात )- 108 वेळा