ॐ
२०-११-२०१०
मन:सामर्थ्यदाता
खूप दिवसांनंतर परत एक नवीन पोस्ट. आजची ही पोस्ट मन:सामर्थ्यदाता सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या चरणी समर्पित. उद्या त्रिपुरारि पौर्णिमा बापूंचा जन्मदिवस.
आज आपण मागे बोलायच्या राहिलेल्या विषयावर बोलूया. मन. प्रत्येक माणसाला एक मन असतं हे सगळ्यांनाच माहीत आहे आणि त्या मनावर आजपर्यंत सगळीकडे एवढं लिहिलं गेलयं की मन हा अभ्यासाचा आणि ट्रीटमेंटचा विषय आहे, हे मला देखील आयुर्वेद शिकायला लागेपर्यंत माहीत नव्हतं. आयुर्वेद शिकताना आम्हाला फ़र्स्ट इयरला एक सब्जेक्ट असायचा. त्या सब्जेक्टचं नाव, पदार्थविज्ञान. सुरुवातीला तो विषय खूप कठीण आणि बोअर वाटायचा, पण कळायला लागल्यावर तो इंटरेस्टींग वाटायला लागला. ह्यात मन, मनाची डेफ़िनेशन, त्याचं काम कस चालतं ह्या सगळ्याचं वर्णन होतं.
आपलं मन हे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जे काही करतो ते करायला मदत करतं. म्हणजे कसं तर आपण जेवतो, बोलतो, खातो, हसतो, वाचतो ह्या सगळ्याच्या सगळ्या क्रियांसाठी मनाचा प्रेझेंस आवश्यक असतो. तसचं आपल्याला जे काही नॉलेज होतं त्यासाठी मनच त्या त्या अवयवाशी संयुक्त व्हावं लागतं.
कोणताही माणूस असो प्रत्येकाच्या शरीरात फ़क्त एकच मन असतं आणि ते अणू म्हणजे अॅटम एवढं असतं. पण हे मन शरीरात काम कसं करतं हे माहीत करून घेण्यासारखं आहे.
समजा आपण एखादं वेळी टि.व्ही. बघत असतानाच पेपर वाचतो त्याचवेळी कोणाशी तरी बोलतोही आणि खातो सुद्धा. सांगायचा मुद्दा की आपण एकाच वेळी अनेक गोष्टी करतो आणि त्या करता प्रत्येक क्रियेत मनाचा प्रेझेंस असतोच, मग हे कसं घडतं. ह्याच्या एक्सप्लनेशनसाठी आयुर्वेदात एक उदाहरण दिलं जातं.
समजा एक फ़ुल घेतलं आणि त्याच्या सगळ्यात बाहेरच्या पाकळीला सुई टोचली आणि ती पार शेवटच्या पाकळीपर्यंत नेली तर आपल्याला सगळ्याच पाकळ्या पिअर्स झालेल्या म्हणजे सुईने टोचल्या गेलेल्या दिसतात. ह्यावरून असं वाटतं की सगळ्या पाकळ्या एकाच वेळी पिअर्स झाल्या असाव्यात पण तसं नसतं एकामागोमाग एक अशा लाईनने त्या पाकळ्या पिअर्स होत जातात, पण बघितल्यावर सगळ्या पाकळ्या एकदमच पिअर्स झाल्यासारख्या वाटतात. एक्झॅक्टली अशाच प्रकारे माणसाचं मन काम करतं. ते फ़्रॅक्शन ऑफ़ सेकंदात प्रत्येक अवयवाशी कनेक्ट होत आणि त्याची क्रिया घडवून आणतं. नाही तर विचार करा जेवत असताना ते फ़क्त जेवणाच्या क्रियेवर कॉन्सन्ट्रेट करेल तेव्हा बघण्याची क्रिया किंवा दुसरी कुठलीही अॅक्शन बंद. विचार करा काय प्रॉब्लेम होईल आणि सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत कामं संपणारच नाहीत. ही वेल ऑरगनाईज सिस्टीम आपल्या शरीरात कंडक्ट करणार्या भगवंताला आपण खरंच धन्यवाद द्यायला हवेत.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मन कायम शरीरात प्रेझेंट असतं. अगदी आपण झोपेत असताना सुद्धा. मात्र कधी कधी ते झोपेतही अॅक्टीव असतं आणि मग माणसाला स्वप्न पडतात,असं आयुर्वेद सांगतो. तर महत्त्वाची गोष्ट ही की आजपर्यंत कोणालाही माणसाच्या शरीरातलं मन दाखवता आलेलं नाही आणि कुठल्याही टेस्ट इ.नी दिसलेलंही नाही. कुठल्याही मेडीकल ब्रान्चच्या स्टुडंटना अगदी सुरुवातीलाच शरीरातले टिश्युजपासून अगदी ब्रेनपर्यंतचे अवयव दाखवले जातात पण तिथेही मन दाखवता येत नाही. कारण आयुर्वेद म्हणतो की मनाचा प्रेझेंस अनुमानाने ओळखला जातो आणि ह्या जगात अनुमान करून जाणल्या जाणार्या असंख्य गोष्टी आहेत. साधीच गोष्ट बघा ना, आपण जी ब्लड टेस्ट करतो ती करण्यासाठी आपल्या शरीरातलं फ़क्त थोडंसं ब्लड घेतलं जातं आणि त्यावरून संपूर्ण शरीरातल्या ब्लडची कंडीशन काय आहे हे पाहीलं जातं .
तर असं हे माणसाचं मन, काम करणार पण कधीच दिसून न येणारं.
आयुर्वेद म्हणतो की माणसाला निरोगी राहण्यासाठी आणि रोगाचा मुकाबला करण्यासाठी मनाची स्ट्रेन्थ-सामर्थ्य आवश्यक आहे. ही मनाची स्ट्रेन्थ औषधापेक्षाही नामस्मरण, उपासना ह्यासारख्या गोष्टींतून मिळते. सध्याच्या काळात तर प्रत्येकाच्या मनाला अनेक आघाड्यांवर लढण्यासाठी सामर्थ्याची नितांत गरज आहे कारण सध्या प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या स्ट्रेस नाही तर भीती खाली वावरतो आहे आणि म्हणूनच एकमात्र भगवंताची-सद्गुरुंची भक्ती ही गोष्टच माणसाच्या मनाला सामर्थ्य देणारी आहे आणि ह्याचा अनुभव आजपर्यंत असंख्य लोकांनी घेतलेला आहे; कारण जो भक्ती करतो तोच निर्भय राहू शकतो.