ॐ
22-10-2010
वैद्यानां शारदि माता।
जीवेत्शरद: शतम्। अशा प्रकारे एखाद्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचे अभिष्टचिंतन (त्याला विश करण्याची) करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. ह्याचा अर्थ त्या व्यक्तीने 100 शरद ऋतु पहावेत थोडक्यात उसकी उमर बहुत लंबी हो. परवाच याचा रेफरन्स कोणाला तरी हवा होता, त्यावेळी अचानक ह्या ओळीची आठवण झाली आणि त्याच बरोबर ही वर लिहिलेली दुसरी ओळही आठवली.
खरं तर ह्या वर लिहिलेल्या ओळीचा अर्थ असा आहे की शरद ऋतु हा वैद्यांसाठी म्हणजेच डॉक्टरांसाठी आईसारखा आहे. आयुर्वेदात डॉक्टसर्र्ना वैद्य असं म्हटल जात. आयुर्वेदाला जेव्हा ऍडमिशन घेतली तेव्हा कॉलेजमध्ये टिचर्सच्या नावापुढे वैद्य किंवा वैद्या असं लिहिलेय असायचं आणि आपल्याला जेव्हा डीग"ी मिळेल तेव्हा आपल्याही नावापुढे अशीच डीग"ी लागेल ह्याचा आनंद व्हायचा. तर वैद्यांसाठी म्हणजेच डॉक्टर्ससाठी हा शरद ऋतु फार फायद्याचा आहे असं म्हटलं जातं. त्याचं पहिलं कारण म्हणजे त्या वेळी बरेच आजार एकदम डोकं वर काढतात कारण सिंपल वातावरणातला बदल. पावसाळा संपून एकदम ऑक्टोबर हिट सुरू होते. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या काळात वैद्यांना भरपूर औषधी वनस्पती मिळायच्या. कारण पावसाळ्यात अनेक वनस्पती उगवायच्या आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यातल्या काही वनस्पती अगदी थोेड्या दिवसांसाठीच जिवंत रहायच्या आणि नंतर नष्ट व्हायच्या. एक उदाहरण सांगायच तर एक भुई आवळा नावाची वनस्पती असते, जी अगदी थोड्या दिवसांसाठीच उगवते आणि नंतर नष्ट होते, ही वनस्पती अगदी छोटीशी असते. अजूनही कधी तरी रस्त्याच्या कडेला ही वनस्पती सापडते. आपण च्यवनप्राशचं नाव ऐकलच असेल. त्यातला महत्त्वाचा इनग"ेडीयन्ट असतो आवळा. पण ह्या भुई आवळा आणि च्यवनप्राशमध्ये वापरला जाणारा आवळा हे दोन्ही वेगवेगळे आहेत. आपल्याकड जनरलीे दोन प्रकारचे आवळे मिळतात. एक छोटे जे जनरली चिंचा, बोरांच्या गाड्यांवर मिळतात, हे खूपच आंबट असतात. च्यवनप्राशसाठी मोठे आवळे वापरले जातात, जे खाल्यावर पाणी प्यायलं की एकदम गोड चव लागते. तर हे जे आवळ्याच झाड असतं ते ह्या ऋतुत वाढायला लागतं म्हणजे इतका वेळ असतं कुठे, असं तुम्हाला वाटेल, पण जेव्हा उन्हाळ्याचा सीझन सुरू होतो म्हणजे एप्रिल-मे तेव्हा हे झाड डॉर्मन्ट स्टेजमध्ये जातं म्हणजे अक्षरश: भूमिगत होत म्हणजे त्याची पानं, फुलं, फळं काहीच जमिनीवर दिसत नाही, फक्त त्याचं मूळ तेवढं जमिनीत राहतं आणि पाऊस पडून गेल्यावर परत एकदा त्याला पान फुटून ते जमिनीवर वाढायला लागतं. तर सांगायचा मुद्दा हा की पावसाळा संपल्यावर अशा असं"य वनस्पती अगदी थोड्या काळासाठी उगवतात. मग त्यांच कलेक्शन ह्याच काळात करून ठेवावं लागतं आणि मग त्यापासून औषध बनवून किंवा सुकवून ठेवून त्या वर्षभर म्हणजे पुन्हा त्यांचा सीझन येईपर्यंत वापराव्या लागतात. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे पूर्वी हे जे वैद्य म्हणजे आयुर्वेदाचे डॉक्टर्स होते ते स्वत: जाऊन ही औषधं तोडून आणायचे, स्वत: त्यापासून वेगवेगळी औषध बनवायचे आणि पेशंटला द्यायचे. आज काल केमिस्टच्या दुकानात गेलं की लगेचच कुठलंही औषध आपल्याला मिळतं आणि समजा एखादं औषध आपल्याला मिळालं नाही तर आपल्याला अगदी चुकचुकल्यासारखं होत. मग पूर्वीच्या काळी जेव्हा औषध सगळ्यात आधी जाऊन शोधून आणा म्हणजे पहिल्यांदा ते औषध म्हणजे ती वनस्पती ओळखता यायला हवी, कारण एक सार"या दिसणाऱ्या अनेक वनस्पती असतात किंवा एकाच वनस्पतीचे अनेक टाइप्सही असतात फॉर एक्झाम्पल काही काही वनस्पतीचे लाल फुल येणारी, निळी फुलं येणारी, पांढरी फुलं येणारी असे प्रकार असतात आणि आपण जेव्हा वनस्पती तोडायला जाणार तेव्हा त्याला फुलं आलेली नसतील तर मग त्यातून आपल्याला हवी तीच वनस्पती तोडून आणायची हे खूपच कठीण काम. मग ती आणून त्याच्यापासून औषध बनवायची आणि ती प्रिझर्व करून ठेवायची. विचार केला तर हे खूपच कठीण काम. पण हे सगळं केलं जायचं आणि शिष्यांनाही शिकवलं जायचं. अजूनही आयुर्वेदात वनस्पतींपासून औषधं बनवली जातात, पण आज काल बऱ्याच ठिकाणी त्यासाठी स्पेशली ह्या वनस्पतींची लागवड केली जाते.
आयुर्वेदात आम्हाला आत्मा, मन, पंचमहाभूतं अशा वेगवेगळ्या संकल्पना अगदी फर्स्ट इयरलाच अभ्यासाला असायच्या. तेव्हा आम्हाला वाटायचं की डॉक्टर होण्याचा आणि ह्याचा काय संबंध? पण आता मला कळतय की डॉक्टरांना ह्या संकल्पना स्पष्ट झाल्या तर त्यांना प्रॅक्टीसमध्ये खूप फायदा होतो आणि जेव्हा एका जिवंत माणसाची ट्रीटमेंट केली जाते आणि जीवन-मरण अशा गोष्टीशी संबंध येतो, तेव्हा खरंच सद्गुरु-भगवंताचं महत्त्व आपोआप कळतं. सो, नेक्स्ट टाइम, लेट्स टॉक समथिंग अबाऊट मन, आत्मा इत्यादि.